Sunday, 7 June 2015

आठवणी १: कथा २१ ते २५ बद्दल


नमस्कार! आठवण - १ मधील शेवटच्या पांच कथांबद्दल लिहिताना एक पूर्ततेचा आनंद वाटत आहे, घेतलेले व्रताचे उद्यापन होत आहे. नियमितपणे हे सर्व ब्लॉग्स लिहीताना त्यांत सुसूत्रता ठेवणं अगदी सोपं गेलं! वाचकांनो धन्यवाद!

मनस्विनीचे आई-वडील जरी शिवभक्त होते तरी बुद्धीची देवता गणपती यांनाही ते मानत असल्याने दर वर्षी येणाऱ्या गौरी गणपतीची भावपूर्वक पूजा करत असत. लहानपणापासून शिकण्याचे वेड असलेल्या मनस्विनीला या उत्सवाचे महत्त्व तिच्या लहानपणी जरी कळत नव्हते तरी वेदपठण, मंत्र जागर इ. संस्कृत तालबद्ध, लयबद्ध व त्रिपाठी मंत्रघोष आजही तिच्या मनावार पक्का ठसा ठेऊन आहेत. या उत्सवाची माहिती ती 'उत्सव श्री गणेशाचा' कथेत वर्णिते.

'माणूस एक जनावरच' ही कथा, समाज प्रतिष्ठीत असो किंवा रांगडा असो, चालतो एकाच मार्गानं. प्रतिष्ठेच्या नावाखाली छुपा तर रांगडेपणात उघड उघड agenda दिसतो! मनस्विनीच्या अनेकविध नोकऱ्यामध्ये तिलाही विविध प्रकारची माणसं भेटली. त्यांचे विविध रवैय्ये तिने जवळून पाहिले आहेत. पण मुळात धागा एकच - स्त्री, संपत्ती, अधिकाराचा दुरुपयोग! मनस्विनी स्वाभिमानी आहे. ती आपली जिद्द पूर्ण करताना नोकरीची गरज, नोकरीत तिच्याकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा ती निरीक्षणाने जाणते. पण नैतिकतेचा प्रचंड भक्कम पाया असल्यामुळे ती अत्यंत हुशारीनं वागते. अर्थात अतिसज्जन माणसं जशी corporate दुनियेत लांब ठेवली जातात किंवा बांधून ठेवली जातात, याचा अनुभव पूर्णपणे घेते. ही कथा म्हणजे 'सवलत मागणं एक प्रकारची भीकच!' तिच्या मनाची तळमळणारी, टोचणारी, जखमी अवस्था तिच्या लिखाणात यथार्थपणे उतरली आहे.

तिच्यासारखच अनेकांना अभ्यासाचं वेड असतं. हे वेड तिनं 'अभ्यास' कथेत रंगवलं आहे. पोटभरू शिक्षणाचा आणि व्यवहारी ज्ञानाचा अर्थार्थी संबंध नाही तरीही ज्ञान हे ज्ञान असून त्याने व्यक्तीचा विकासाच होतो. ते वाया जात नाही. म्हणून प्रत्येकानं जरूर शिकावं असं मनस्विनी मानते.

आज तिचे आयुष्य एक यशस्वी स्त्री म्हणण्या इतकं परिपूर्ण आहे. कुटुंबात, समाजात ती सर्वांना हवीशी वाटते पण या शतकातील कुटुंबे, जास्त करून मध्यम वर्गीय कुटुंबे, विखुरली आहेत. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पैसा कमावण्यासाठी, स्वतःची तरक्की व्हावी म्हणून गरजेची झाली आहे. घर लहान पडतं, पैसे कमी पडतात, भावा भावांच्या कमाईतील तफावत, जबाबदारी टाळण्याची युक्ती, बायका बायकांतील चढाओढ - एक नाही, अनेक कारणं! पण याचा अर्थ त्यांच्यातील प्रेम भावना आटली आहे असे नाही. Skype, Facebook, मोबाईल, आय पॅड एक नाही अनेक मार्गांनी ती कुटुंबे जोडलेलीही आहेत. Thanks इंटरनेट दादा! दुरूनही एकमेकांची विचारपूस करतात, सुख दु:ख जाणून घेतात, अडचणीत मदत करतात. तरीही त्यांचा प्रत्यक्ष सहवास नाही. या सहवासाच्या अभावाने या आपुलकीत काहीतरी 'नक्कीच' कमी आहे. मनस्विनीच्या सर्व अनुभवाने, तिला आपण सोन्याच्या पिंजऱ्यात असल्यासारखं वाटतं. सर्व सुखसोयी, आनंद, प्रतिष्ठा जो मिळवता मिळवता माणूस जन्म घालवतो, तो मिळूनही ती 'ने मजसी ने' असे उद्गार काढते. कुठे ने? या पलिकडे की परत मायभूमीकडे - आपणच वाचून पहावे.

कुठल्याही चांगल्या गोष्टीचा आरंभ गणेश पूजेने करतात. आज या पुस्तकाचा शेवट. मग गणेश स्मरण मनस्विनीने का बरं केलं? हाच आठवणी - २ चा शुभारंभ समजावा! लवकरच आठवणींचा पुढील भाग घेऊन येईपर्यंत रामराम करते

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: गणपती बाप्पा मोरया!  

Saturday, 6 June 2015

आठवणी १: कथा १६ ते २० बद्दल


नमस्कार! चंदेरी नगरी मुंबई! चमचमत्या अत्याधुनिक नव नवीन गोष्टी! सर्वच बाबतीत अग्रेसर शहर! उत्तमातील उत्तम तसंच वाईटातील वाईट इथं सहज दृष्टीस पडतं. सामान्यांना मुंबईची लोकल कधीच चुकत नाही. चांगल्याचा वाईटाचा अनुभव इथेही येतो आणि त्याला तो तोंडही देतो. लोकलमधील भिकारीणीचा किस्सा, या शहरातील रीत कशी मानवी चांगुलपणाला आळा घालते, आणि संशायाचे भूत मनात बाळगून, लोकं सतत कसे सावध वावरतात हे या गोष्टीत छान दाखवले आहे. 'जग कशावर चालते' उत्तर सोपं नि साधं आहे, गरजवंताची गरज आणि पैशाची नड! मनस्विनी तिच्या आयुष्यातील अशा क्षणाचे वर्णन करते जे तिच्या स्वाभिमानी स्वभाव आणि परिस्थितीच्या आहारी न जाणे यांतील निवड करणरे आहे.

'रोजची' गोष्ट रोजचीच गोष्ट असून, समाजातील गद्दारीवर टीका आहे, अपंगत्वावर नव्हे. कशाचं ही भांडवल करून गद्दार लोकं आपला स्वार्थ साधतात. गडबड घोटाळे करूनही आपली ध्येयपूर्ती साधतात, अगदी कायदेशीर पणे!

'एका पिढीतील श्रीमंतीचा माज' या गोष्टीत मनस्विनी तिची नोकरी कशी गमावते ते पहा. ज्या कारणाने सर्व मुलींची सुट्टी केली जाते, त्याबद्दल कोणीच काही करू शकत नाही पण श्रीमंतीचा हा माज इतर गरिबांना कसा सोसावा लागतो आणि गंमत म्हणजे, ही परिस्थिती निर्माण करणारी व्यक्ती तिथेच आपले बस्तान कायम करते. जागोजागी हेच दिसतं…

प्रत्येक कर्तृत्ववान मणसाचा एक काळ (era) असतो. त्या काळाची शोभा, शान, वैभव त्याच्या काळापुरती झळकते परंतू त्याच्या पश्चात ते सारं लोप पावतं. 'आंब्याचे साम्राज्य' ही अशीच एका glorious past चे शब्दचित्र आहे. सर्व साधारणपणे येणारे हे अनुभव मनस्विनीने या पाच गोष्टीं द्वारे सांगितले आहेत, तिच्या अनोख्या शैलीत. वाचून अभिप्राय जरूर कळवा

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: Beware! बनेल लोकं!

Friday, 5 June 2015

आठवणी १: कथा ११ ते १५ बद्दल

नमस्कार! आपल्या घरांत जे आस्तिक किंवा नास्तीकपणाचे वातावरण असतं, त्यांचप्रमणे त्या घरांतील मुलांची मने नकळत घडत असतात. मनस्विनी ज्या विचारांच्या कुटुंबात वाढली, त्याचप्रमाणे ती बनली. परिस्थितीनुसार तिचे विचार ही बदलत गेले. आत्म्याचं अस्तित्त्व ती विश्वासपूर्वक मानते. तरीही भक्तीच्या नावानं होणारं अवडंबर तिला आवडत नाही. ती 'त्या' शक्तीबद्दल कृतज्ञ आहे. बालवयात असणारी अंधश्रद्धा तिला समाज आल्यावर बदलते - ती practical होते. हा बदल कसा येतो, म्हणजेच 'अंधश्रद्धा' ही गोष्ट. तिच्या कुटुंबातील आत्या तिच्या वरील प्रेमापोटी रूढी मोडून, स्वत:च्या मनाची घडण दूर करून तिचा खुळा हट्ट पुरवते. या तिच्या कृतीचा उमटलेला ठसा नि त्याचा परिणाम मनस्विनीच्या 'डोक्यातला गजरा' प्रकरणात स्पष्ट दिसतो.

आपलं आयुष्य जगत असताना कधी कधी अचानक त्याला खीळ बसावी असं घडतं. सर्व प्रकारे विचार करूनही ते कसं का घडतं याचं उत्तर तिला मिळत नाही, तेव्हा 'योगायोग असेल का?' ह्या विचाराचा पगडा तिला शिवतो. एरवी नास्तिक असलेली मनस्विनी विश्वास अविश्वासाच्या border line वर दिसते.

'ज्ञानाचा उपयोग' ह्या गोष्टीत तिच्या घरातील मुलींची काळजीपूर्वक होणारी जोपासना जाणवते. घरातील शिस्त सांभाळताना, उच्च नैतिक मूल्ये राखताना तिच्या वडिलांची होणारी तारांबळ पहायला मिळते. स्त्री शिक्षण जरूर वाटणारे तिचे वडील तिला समाजात कसं वागावं, ह्याचे पाठ नकळत देत होते. तिच्या शिक्षणाला तिच्या घरातील स्त्रियाच अडथळे आणत असत, याचं आश्चर्य वाटतं! 'लेझीम स्पर्धा' या कथेत अशा परीस्थित, तिला मिळालेल्या दुर्मिळ शिक्षण संधीबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. या स्पर्धेचं रसभरित वर्णन मात्र ठसकेबाज, कलात्मक, glamourous लेझीमचे प्रदर्शन, यथार्थ दिसते. वाचक त्या काळात जाउन, त्यांचे innovation, प्रसंगाचे thrill आणि विजयाचा गौरव अनुभवतो. आपणही वाचून बघा. 

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: संधीचाच अवकाश!

Thursday, 4 June 2015

आठवणी १: कथा ६ ते १० बद्दल


नमस्कार! बालपणांत सहज सुलभ मिळणाऱ्या नैसर्गिक गोष्टींतून मनस्विनी आनंद घेत असे. त्यासाठी पैसे खर्चावे लागत नसत. त्यातून कितीतरी गोष्टी ती शिकली. 'बुचाची फुले' ही याचीच आठवण! बुचाची फुलं त्या काळातील वर्गातले किस्से, गंमत, सहकार्य दर्शवते. ती अतिशय जिद्दी आहे, हट्टी आहे पण सर्वांची लाडकी आहे. मनात ज्या गोष्टीचं ठाण मांडते ते कसंही पुरं करते . 'माझी सात्विक जिद्द' ही आठवण मनस्विनीला सात वर्षांनी मिळालेल्या शिक्षण-संधीची कहाणी आहे.

ती मूर्ती पूजक नाही. देवाच्या नावावर भंपक गोष्टी तिला पसंत नाहीत, तरीपण तिच्या आयुष्यात असं काही घडलं की ती त्याला नकळत योगायोग तर नाही? असं 'अनाकलनीय' आठवणीत म्हणते. अत्यंत सनातनी, शिस्तप्रिय घरांत ती लहानाची मोठी झालेली आहे. तरीही शाळेतील कुलाप्रमुखाची निवदडणुक नि प्रत्यक्ष आयुष्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा तिने केलेला अव्हेर ती आपली पायरी ओळखून करते. तिच्या capacity चा तिला योग्या अंदाज आहे आणि ती सत्तेच्या मोहाला बळी पडत नाही. ही तिची वागाणूक जगाच्या दृष्टीने उद्धटपणाची असली तरी तिच्या भूमिकेतून आपण विचार कराल, तर तिचे पक्के विचार अमान्य करता येणार नाहीत.

तिच्या आयुष्यात 'बक्षीस समारंभ' आले. असे समारंभ हे अफाट मेहनतीचं फळ, परिश्रमाचे श्रेय असतं. राज्यात नंबर आल्यावर, तिच्या आई वडिलांनी बोलावणे असूनही, गैरहजेरी लावली याचे तिला आजही दु:ख आहे. यासाठी रडत न बसता पुढील जीवनात ती आपल्या मुलांच्या प्रत्येक बक्षीस समारंभात सामिल होते. समारंभ कुठेही असो, कितीही वाजले असोत, दोन दोन गाड्या बदलूनही ती त्या कार्यक्रमाला जाते, मनसोक्त टाळ्या वाजवून मागची कसर भरून काढते. आनंद लुटते. यातच सर्व काही येतं.

अशा आठवणी गप्पा टप्पा मारत तुम्ही मनस्विनी ला अधिक जवळून ओळखू लागाल

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: जिद्द तारून नेते

Wednesday, 3 June 2015

आठवणी १: पहिल्या पाच गोष्टी

नमस्कार! आजच्या ब्लॉग मध्ये आठवणी १ ते ५ बद्दल अधिक सांगते. आयुष्यात सर्व आठवणी दु:खामयी नसतात तर जास्त करून आनंदमयी असतात हा मनस्विनीचा अनुभव थेट आपल्या सारखाच आहे. या प्रवासात मिळणारे मनाचे हेलकावे अलौकिक वाटतात. लहानपण कितीही दु:ख आणि कष्टांनी माखलेलं असलं तरी आपण जस जसे मोठे होतो तसतसे त्यांतील सुखद भाग निवडून आपण त्याची सुंदर माळ बनवतो. बालपणाच्या memories अधिकाधिक refine होतात आणि अधिक जिवलग होतात.

प्रायमरी शाळेतील शिपाई (प्यून) सुद्धा आपल्या मनात घर करून बसतो. त्याच्या चिडवण्याला उत्तर न देऊ शकलेली मनस्विनी त्याला पट्टीने मारण्यास धावते. त्यात तिचा बालीशपणा आहे जो आजही अतिशय गोडव्याने तिच्या लिखाणात प्रस्तुत झालेला दिसतो. समाजातील स्त्री-पुरुष भेद तिला नेहमीच खटकतो. वीणा विराणी असो किंवा वीरेंद्र शहा असो, समाजरचनेच्या दोषाने त्यांना होणारा त्रास शारीरिक हानी नसून मानसिक हानी अधिक करतो. अशा वेळी खात्रीची, विश्वासाची व्यक्ती ही बहुतांशी प्रेमळ teacher असते. मुलं आणि त्यांचे पालक हे नातं जन्मसिद्ध असलं तरी जेव्हा त्यांच्या मतांत तफावत येते तेव्हा ती दूर करणारी व्यक्ती teacher च असते. या भूमिकेत मनस्विनी अनेकदा गेलेली दिसते.

'पहिल खोटं' या आठवणीत तिच्यावर घरातून असलेले संस्कार अप्रतिम प्रकारे मनस्विनीने दाखवले आहेत. खोटं बोलणं, चोरून करणं हे वाईटच. खोटं आज नाही उद्या, मग, नंतर कधीतरी, उघडं पडतं. स्वत:च्या मनाला खातं. आपली चैन सुख नष्ट करतं. म्हणून ही गोष्ट वाचली की या संस्काराचं महत्त्व आपल्यालाही पटेल. व्यवहारिक खोटं हे ही  खोटच जरी आज त्याला पुसट मान्यता समाज देतो! निष्कर्ष : या दुनियेत खरं पाहिलं तर खरं आणि खोटं काहीच नाही तर ते relative असतं आणि आपल्या आपल्या जागी योग्यच असतं.

समाजाच्या अदृष्य बंधनानं पालकांची होणारी कुचंबणा, मुलांची मानसिक हानी आणि त्यांच्या इच्छा आणि कुवतीचा ऱ्हास मनस्विनी 'किती अनैसर्गिक' या गोष्टीत व्यक्त करते. समाजानं आज या बंधनांतून बाहेर पाडायची वेळ आली आहे. मनस्विनीने सहज मांडलेले तिचे विचार आपल्या मनात दीर्घ काळ घर करतील अशी आशा करते. 
Manaswini's quote of the day: Truth is relative.

Tuesday, 2 June 2015

आठवणी भाग १: Introduction


नमस्कार! आठवणी (लघुकथा) चार भागांत लिहायचं ठरवलं. आज पहिला भाग आपल्या हातांत देतांना मनस्विनीला अतिशय आनंद होतं आहे. 'अनुभूति' काव्य संग्रहानंतर इतक्या लवकर हे दुसरे ebook प्रसिद्ध करतांना मनाला एक वेगळेच समाधान मिळत आहे. पुढील भाग ही माझ्या हातून लवकर पूर्ण व्हावेत ही इच्छा!

आठवण १,,,४ सर्वच छोट्या छोट्या कथा आहेत. प्रत्येक कथा 'आठवणी'च्या रूपांत आहे. मनस्विनी प्रत्येक कथेतील मुख्य व्यक्ती (narrator) म्हणून 'मी'च्या भूमिकेत वावरते आणि वाचकांना गोड फ़सवते. वाचकाला हेच मनस्विनीचं खरं आयुष्य असावं असं वाटतं. प्रत्यक्षात 'मी' होण्याचं वैशिष्ट्य हाच या आठवणींचा केंद्रबिंदू आहे.

प्रायमरी शाळेतील प्युनपासून सुरुवात होणारी आठवण एका जबाबदार तरुणीच्या, व्यवहारी जगाच्या ओळखीपर्यंत अगदी अलगद, शांत नि सरळसोट मार्गाने पुढे सरकते. तरीही गोष्टींमध्ये link आहे. शिक्षिकेच्या भूमिकेतून ती विराणी, वीरेंद्र अशा मुला मुलींकडे बघते तर लग्नाच्या वाढलेल्या वयामुळे समाजातील अशा मुलींच्या अडचणी ती सांगते. समाज स्त्रियांकडे, विशेषत: समाज-चाकोरीपासून दूर गेलेल्या किंवा घालवल्या गेलेल्या मुला मुलींची भूमिका ती निभावते.

विविध नोकऱ्यातील ठिकाणांपासून व्यक्तीरेखांपर्यंतची शब्दचित्रे या संग्रहात दिसतात. साठ सत्तर वर्षांपूर्वीपासून आजपर्यंतचे विवध क्षेत्रांतील, अनेकविध गोष्टी ती 'मी' या व्यक्तिरेखेभोवती गुंफते. पूर्वीच्या सामाजिक कल्पना, त्याला अनुसरून असलेल्या रिती, मुलांकडे पहाण्याचा दृष्टीकोन, घराण्याची परंपरा आणि त्यांचा विपरीत परिणाम भोगणारी त्यांचीच मुलं पाहिली की आज हैराण व्ह्यायला होतं. आई वडीलांच्या संसाराला हातभार लावणं आणि त्यागीपाणाची मूर्ती असणं गृहीत धरलं जायचं. पण याबद्दल मतप्रदर्शन करून ती समाज कसा घडला एव्हढच सांगू शकते .

गणपती उत्सव, आंब्यांचं साम्राज्य, रोजची गोष्ट या कथा समाजातील चांगल्या वाईट प्रथा दाखवतात. एकत्र कुटुंबातील आत्या हे खास अधिकारी व्यक्तीचं चित्र रेखाटते. मुलींच्या शाळांतील प्रगती 'लेझीम स्पर्धा' मध्ये दाखवते. 'बक्षीस समारंभ' मध्ये श्रीमंत प्रसिद्ध बाप किंवा नवरा असणाऱ्या (backing वाल्या) मुलींना मिळणारी खास वागणुकीन वशिला नसलेल्या 'मी' वर होणाऱ्या अन्यायाची तिला चीड येते. ती जिद्दीने पदव्या तर मिळवते पण त्या पदव्यांचा तिला फायदा मिळतो कां? थोडक्यात योग्य वयात, ज्या त्या वेळेस, जे ते एखाद्याला मिळणं किती जरूर आहे, हे वंचित मनस्विनी सांगते.

स्त्रीजात पृथ्वीवर आली तेव्हा पासूनच अधिकार-कनक-कांता हेच समीकरण असण्याची मनस्विनीची मनोधारणा चूक वाटत नाही. पूर्वी हे होतं नि आजही आहे. फक्त expression च्या तऱ्हा वेगळ्या, भाषा वेगळी, प्रकार वेगळे. एव्हढेच!

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386

 

Monday, 1 June 2015

अनुभुति: इतर कविता


नमस्कार! आत्तापर्यंत अनुभूति संग्रहातील विविध categories मधील कवितांबद्दलचे ब्लॉग्स वाचलेत. पण मनस्विनीने अशाही काही काविता केल्या आहेत, ज्या साधाराण अनुभवांना वेगळ्या ढाच्यांत बसवतात.

वाढदिवसाचे 'अभिष्टचिंतन' हा आपल्या संसृतीचे एक अंग आहे. आजच्या इंग्रजलेल्या संस्कृतीत birthday हा केक, पार्टी नि गिफ्ट यांनाच महत्त्व देतो. पूर्वीप्रमाणे आई-वडिलांना, घरातील सर्व मोठ्यांना, वडीलधाऱ्यांना नमस्कार करून झाल्यावर, घरातील प्रत्येकजण त्यांच्यात्यांच्या पद्धतीनं birthday boy / girlचं कौतुक करत. कुणी उचलून घेई, कुणी मुका घेई, कुणी तोंड गोड करीत तर कुणी स्वतः बनवलेली वस्तू भेट देत असत. पहाटे आईने उटी लावून घातलेली अंघोळ, नवीन कपडे, गोड गोड आवडीचं जेवण, मित्र मैत्रिणींचा गराडा आणि आपल्या मनासारखं वागायची मुभा!

कितीही कौतुकानं मुलांना वाढवलं तरी आई-वडील व ती मुलं यांच्यात असणारं पिढीचं अंतर विसरता येत नाही. ती मोठी झाल्यावर त्यांची आवड, मित्र मैत्रिणींचा प्रभाव / अपेक्षा यामुळं ती कधी पठडी सोडून वागतात, बिघडतात! त्यांच्या कडून 'अक्षम्य चूक' होते, ती कवितेत पहा.

भावनाप्रधान मनस्विनी मनाच्या कोणत्या अवस्थेत गीत जन्मते हे, 'जन्मते गीत' कवितेत सांगते. हा नाविण्य पूर्ण विषय मनस्विनी अनोख्या प्रकारे हाताळते. 'नयना' ही कविता नेत्रांतील विविध भावना स्पष्ट करते. स्त्री व तिच्या भावना यांची सांगड घालते. 'एकाकी' आणि 'लहर'या दोन चिमुकल्या कविता वाचकावर खूप प्रभाव टाकतात. हे ती वाचकांच्या कुवतीवर सोडते. आपण काढाल तेव्हढे अर्थ त्यांत निघतील.

आयुष्यात सुख दु:ख हातात हात घालून चालतात (ह्याला काही अपवाद आहेत) दोन्ही प्रसंगी प्रत्येकाला असणारी मित्रंची जरुरी 'फ्रेंडकी जरूरत' कवितेत लिहिले आहे. परक्या घरातून आलेली 'स्नुषा' ही पोटच्या मुलापेक्षा ही अधिक आपुलकीने सासर आपलंसं करते. वृद्ध सासऱ्याची आपल्या वडिलांसारखी काळजी घेते व आधार देते. तेव्हा भारतीय संस्कृतीचा मनस्विनीला अभिमान वाटतो.

चिरतरूण मनस्विनी जेव्हा आजच्या तरुण मंडळींच्या संपर्कात येते, तेव्हा या तरुणांची दिशाभूल झालेली तिला आढळते. अडचणींचा सराव नसलेल्या पिढीला स्त्रीसुलभ पद्धीतीने बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. म्हणून वर्तमानात चिरतरुण अवस्थेत ती जगावे असे recommend करते.

या संग्रहाच्या शेवटच भजन सद्यस्थितीचे आहे. तिथे कंसात लिहिलेल्या शब्दांचा उच्चार घोगऱ्या आवाज काढला तर भजनाची मजा काही औरच येते. अगदी टाळ, झांजा, मृदुंग घेऊन भजनाच्याच चालीवर गाऊन बघा. मनस्विनीचं innovation एका नवीन प्रकाच्या पद्याचा अनुभव देईल. अनुभूति संग्रह वाचा आणि facebook वर जरूर कळवा.