Saturday 6 June 2015

आठवणी १: कथा १६ ते २० बद्दल


नमस्कार! चंदेरी नगरी मुंबई! चमचमत्या अत्याधुनिक नव नवीन गोष्टी! सर्वच बाबतीत अग्रेसर शहर! उत्तमातील उत्तम तसंच वाईटातील वाईट इथं सहज दृष्टीस पडतं. सामान्यांना मुंबईची लोकल कधीच चुकत नाही. चांगल्याचा वाईटाचा अनुभव इथेही येतो आणि त्याला तो तोंडही देतो. लोकलमधील भिकारीणीचा किस्सा, या शहरातील रीत कशी मानवी चांगुलपणाला आळा घालते, आणि संशायाचे भूत मनात बाळगून, लोकं सतत कसे सावध वावरतात हे या गोष्टीत छान दाखवले आहे. 'जग कशावर चालते' उत्तर सोपं नि साधं आहे, गरजवंताची गरज आणि पैशाची नड! मनस्विनी तिच्या आयुष्यातील अशा क्षणाचे वर्णन करते जे तिच्या स्वाभिमानी स्वभाव आणि परिस्थितीच्या आहारी न जाणे यांतील निवड करणरे आहे.

'रोजची' गोष्ट रोजचीच गोष्ट असून, समाजातील गद्दारीवर टीका आहे, अपंगत्वावर नव्हे. कशाचं ही भांडवल करून गद्दार लोकं आपला स्वार्थ साधतात. गडबड घोटाळे करूनही आपली ध्येयपूर्ती साधतात, अगदी कायदेशीर पणे!

'एका पिढीतील श्रीमंतीचा माज' या गोष्टीत मनस्विनी तिची नोकरी कशी गमावते ते पहा. ज्या कारणाने सर्व मुलींची सुट्टी केली जाते, त्याबद्दल कोणीच काही करू शकत नाही पण श्रीमंतीचा हा माज इतर गरिबांना कसा सोसावा लागतो आणि गंमत म्हणजे, ही परिस्थिती निर्माण करणारी व्यक्ती तिथेच आपले बस्तान कायम करते. जागोजागी हेच दिसतं…

प्रत्येक कर्तृत्ववान मणसाचा एक काळ (era) असतो. त्या काळाची शोभा, शान, वैभव त्याच्या काळापुरती झळकते परंतू त्याच्या पश्चात ते सारं लोप पावतं. 'आंब्याचे साम्राज्य' ही अशीच एका glorious past चे शब्दचित्र आहे. सर्व साधारणपणे येणारे हे अनुभव मनस्विनीने या पाच गोष्टीं द्वारे सांगितले आहेत, तिच्या अनोख्या शैलीत. वाचून अभिप्राय जरूर कळवा

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: Beware! बनेल लोकं!

No comments:

Post a Comment