Friday 22 May 2015

अनुभूति: Feelings बद्दल


'अनुभूति' काव्य संग्रहात मनस्विनीचे विविध मूड जाणवतात. प्राण्यांना भावना असतात आणि माणूस तर प्रगल्भ बुद्धीचा, संस्कारीत जीव. मग त्याची भावना ही अधिक तीव्र, अधिक सूक्ष्म असणं स्वाभाविक आहे. त्याला भाषा आहे, त्याला लिहिता वाचता येतं आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर तो भराऱ्या मारतो. त्यांच्याद्वारे तो भावना रंगवतो, खुलवतो. सृष्टीतील गोष्टी तो आपल्या भावनांशी जोडतो, त्यांतील साम्य, तफावत आणि विसंगती तो शोधू शकतो. कविता कथा लिहू शकतो. मनस्विनिच्या भावनाही निसर्गाशी आगदी निगडीत आहेत. निसर्गात पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बर्फाचे नि तेव्हाच्या निसर्गाचे वर्णन यांची तुलना आपल्या वृद्धावस्थेशी करते. त्याद्वारे ती वाचकांना आपली मने चिरतरुण ठेवायला सांगते.

प्रयत्नपूर्वक आपली इच्छा पूर्ण झाल्यावार तिला 'मुक्ती' मिळाल्यासारखं वाटतं, ती आनंदी होते. मनस्विनीच्या कवितांत कित्येक भावनांच्या लहरी तरळतात. मुक्ती सर्वोच्य पण त्याआधी समाधान, स्नेह, कृतज्ञता, परोपकार, अनुकंपा, राग, आलोचना, तिरस्कार, भय आदि भावना ती अनुभवते.

लहानपणीच्या आपल्या कल्पना ह्या कल्पनाच असतात. जरा वय वाढल्यावर, दुनियेचे खरे रूप समजू लागल्यावर काही कल्पना चूक असल्याची 'अनुभूति' तिला होते. Reality आणि आपली कल्पना ह्यांतील तफावतीत भावनांचा उगम होतो. पुढे परिस्थिती आणि वातावरणाने ह्या भावना बदलत रहातात आणि मनस्विनी परिपक्व होत जाते. गम्मत पहा, ती nature जाणते आणि मग निसर्ग तिला अधिक कल्पना देतो. तिचा सर्वांगीण विकास होतो. बालपणातील चुकाही तिला कळतात त्यामुळे ती अचानक गंभीर होते. आपल्या जीवनातील चुका प्रत्येकाने दुरुस्त केल्या पाहिजेत अस तिला वाटतं,'टारगट' कविता याचेच प्रतिक आहे. जाता येता तिचे निरीक्षण असं सुचवतं की चालू घडिला समाजात असणाऱ्या प्रथा किंवा न मिळणारं व्यवहाराचं शिक्षण हे घातक आहे. या बद्दल ती कडक आणि बिनधास्त बोलते. Corrupt झालेल्या सामाजिक प्रथांचा तिला राग आहे हे तिच्या 'विदारक' 'परीक्षा' कवितांत स्पष्ट जाणवते. सासर माहेर यांचं जेष्ठ कनिष्ठ नातं का केलं जातं याचं उत्तर ती शोधते आणि दोन्हीकडची नाती स्वत:च्या वाढीसाठी किती निगडीत आहेत हेही तिला पटते. तरीही प्रत्येक नात्यानं आपली मर्यादा ओलांडायची नसते हे ही तिला जाणवते.

मनस्विनिच्या सर्वच कवितेत तिचे deep feelings दिसतात पण काही कविता feelings बद्दलच आहेत. त्या वाचताना तिच्या खऱ्या स्वभावाचे दर्शन होते. मुळात भावनाप्रधान असलेली मनस्विनी कर्तव्यपूर्तीसाठी कशी कणखर होत जाते हे वाचकांना जाणवेल.

'अनुभूति' तील कविता जरूर वाचा, विविध भावनांचा आस्वाद घ्या आणि facebook वर कॉमेंट्स टाकायला विसरू नका!

 


No comments:

Post a Comment