Wednesday 20 May 2015

अनुभूति: पार्श्र्वभूमी


नमस्कार! आज मी माझ्या पहिल्या ई बुकच्या बद्दल थोडसं लिहिते. म्हणजेच मनस्विनीच्या 'अनुभूति' कविता संग्रहाबद्दल… प्रत्येक व्यक्तिला कधी ना कधी या अनुभूतीचा अनुभव येतच असतो, मग मनस्विनीच्या अनुभूतीच वेगळेपण काय? नि कसं?
ही परिपक्व स्त्री चांगल्या घराण्यातील आहे. तिने समाजातील अनेक व्यक्ती अगदी जवळून न्याहाळल्या आहेत. त्यांची जीवनशैली, सुख दु:ख ती पूर्णपणे जाणते. इतकेच नाही तर ती दु:खे, कुचंबणा आपलीच आहेत असे मानते. त्या वेदना ती अनुभवते. या एकरूप होण्यामुळे अनुभूति मधील प्रत्येक कविता स्वानुभवाच्या अनुभूतीतून लिहिलेल्या दिसतात.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 'जनतेसाठी राज्य' ही कल्पना रुजली. सर्वांना सर्व हक्कानं मिळाव ही त्यामागची भावना. त्यामुळे संपूर्ण समाजरचना ढवळून निघाली. त्याचे चांगले वाईट परिणाम समाजात उमटले. कर्तव्यापेक्षाही माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव अधिक प्रकर्षाने झाली. कोंडलेली स्त्री जागी झाली, खडबडून उठली. समाजरचनेत त्यांची केली गेलेली कोंडी, त्याचे दुष्परिणाम ती भोगत होती. मध्यमवर्गीय स्त्री या सर्वाचा मोठ्ठा बळी ठरली. कुटुंबातील तिचे दुय्यम स्थान, कर्तृत्वाला नसलेला वाव, शिक्षणाचा अभाव, विधवांना मिळणारा 'आश्रित' हा दर्ज्या ई. एक नाही अनेक अडचणीत ही स्त्री डुम्बली होती. आजच्या नव्या पिढीला याची अंधुकच कल्पना आहे. स्वातंत्र्यात जन्मलेली आजची स्त्री सर्वार्थानं 'पुढे' गेलेली दिसते. या सर्व बदलांची साक्षीदार मनस्विनी आहे. पिळवटून निघालेली मनस्विनी याच भावना, वेदना आपल्या कवितेत रंगवते. वेग वेगळ्या समाजातील मुली, स्त्रिया कश्या वेग वेगळ्या दडपणात आहेत, याच निरीक्षण तिनं केलाय. आजची स्त्री कुठे चुकत आहे किंवा तिची प्रतिक्रिया disproportionate असू नये हे ती स्पष्ट शब्दात लिहितेय आणि त्यांना सावध करतीये. यासाठी तिने अनेक व्यक्ती आणि प्रसंगांचे शब्दचित्र काव्यात गुंफल आहे. या स्त्रियांच्या मनात जावून आपणच ते भोग भोगले आहेत अशा direct पद्धतीने तिने कविता सादर केल्या आहेत. कधी कधी तिचा मूड विडंबनान आपलं म्हणणं पटविण्याचा आहे, कधी कधी ती बाष्कळपणे सत्याची 'अनुभुति' देते. खालावत चाललेला समाज, गमावत चाललेली नीती मूल्येही ती टिपते. पर्यावरणाची काळजी तिला वाटते, तर कधी आपल्या आत्म्याशीच ती बोलते. अनेक प्रश्र्न तिच्या मनात येतात, त्यांची उत्तरे ती शोधण्याचा प्रयत्न करते. तिला जे समजलं आहे त्यातून ती नवीन पिढीला बोध घ्यायला सांगते. बालगोपालांशी ती एकरूप होते, आनंदी होते. मनस्विनी एक आई आणि उत्तम शिक्षिका असल्याने, मागच्या पिढ्यांची 'ठेव' ती जाणते आणि त्यात स्वत:ची भर घालण्याचा हा तिचा प्रयास आहे. कवितांच्या विविध प्रकारातून तिला खूप खूप सांगायच आहे. ती तत्ववेत्ती नाही तरी एक चांगली व्यक्ती आहे, हे वाचकांना जाणवते. तर्कशास्त्र, विज्ञानाकडे फिरवलेली पाठ असा समाज तिच्या नजरेला खुपतो. अंधश्रद्धेवर ती प्रहार करते पण श्रद्धाळू भारतीय समाजाचे वर्णन ती शेवटच्या भजनात करताना कचरत नाही.

मनस्विनी ज्या समाजात जन्मली, वाढली, त्या समाजातील कमतरता तिच्या काव्यात दिसते. बऱ्याच अनुभवांची गाठोडी तिच्या जवळ जमली, ती अस्वस्थ झाली नि तिच्या संवेदनाशील मनावर दडपण आलं. स्वतःला relax करण्या साठी लिहिलेल्या ह्या कविता तुम्हाला स्पर्श करतील. पुढील ब्लॉग्स मध्ये तिच्या कवितांच्या प्रकारांबद्दल विस्तारित लिहीन. तोवर अनुभूति कविता संग्रह जरूर वाचा आणि facebook वर कॉमेंट्स करा.




No comments:

Post a Comment