Tuesday 19 May 2015

Namaskar vaachakaanno!

नमस्कार! रसिक वाचकांनो - नमस्कार!

एखाद्या आळीन सुंदर फुलपाखाराच रूप घ्यावं - आपल्या कोशातून बाहेर पडावं - आणि झूSSS वेलींवर उडावं - तशीच मी मनस्विनी खूप खूप वर्षांनी आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. एक नवा उत्साह, एक नवा जोश घेऊन! प्रत्येकाच आयुष्य ही एक नवी 'कहाणी' असते. ती कहाणी कधी सुखाची, कधी दु:खाची पण जास्त करून सुख आणि दु:खाचं बेमालूम मिश्रण असतं. वजनाचा काटा जसा १ ग्राम वजनानं ही वर-खाली होतोनां तसं! पण मला मात्र आयुष्य सुंदर वाटतं. या झोक्यावर हिंदोळे घेताना मला गाणं म्हणावसं वाटतं. हे मात्र खरं की ते गाणं कधी प्रेमगीत, आनंदगीत, सुखदगीत, यातनागीत, वेदनागीत तर कधी बालगीतही असू शकतं! माझ्या आवाजाची 'प्रत' महत्त्वाची नाही तर त्यांतील भावना विणणारे शब्द अधिक महत्त्वाचे असतात असं म्हणानां! शब्द भावना व्यक्त करतात बस्सSS
 
मनस्विनीची रचना हे ह्याचेच उदाहरण आहे. लहानपणीची,तरुण,प्रौढ किंवा उतारवयाची मनस्विनी आपले विविध क्षेत्रातील अनुभव आणि त्यांतून तिला झालेली जाणिव, ज्ञान, शहाणपण यापेक्षाही जीवनाचा अर्थ ती जाणू लागली. याच आनंदानं तिला काव्य सुचलं. ती लिहू लागली. तो आनंद तिनं शब्द रुपानं आपल्या सर्वांना वाटण्यासाठी पाठवला आहे. आपण जेव्हढे मनस्विनीशी एकरूप व्हाल, तिला अधिक जवळून पहाल, तितके तिला अधिक ओळखू शकाल. तिचे गुण (आणि दोषही) आपल्याला जाणवतील. त्याची जाण आपण माझ्या फेसबुकवर कमेंट्सच्या रूपानं द्या. माझा आनंद द्विगुणित होईल!
 
पुनर्भेटीत आनंद तर आहेच पण त्याहूनही अधिक आनंद आपण केलेल्या चांगल्या वाईट टीकेत उत्तम interaction होईल. मी बोलतीये आणि तुम्ही ऐकताय ही कल्पना न रहाता, वस्तुस्थिती होईल! म्हणजे - नव्या कल्पना, नवी वस्तुस्थिती आणि 'अनुभूतीचा' ठेवा यांचा त्रिवेणी संगम! पावित्र्याच प्रतिक!! एक नवीन संधी यांतून जुनी मूल्य - नवीन विचारधारा असे चित्र उभे होईल. शक्य होईल तितके ब्लोग्स मी येथे लिहिणार आहे. सुरुवात अनुभूती संग्रहातील काही निवडक कवितांच्या अवलोकानाने करते. कवितांची पार्श्र्वभूमी तसेच त्यांचे बदलते अर्थ अधिक स्पष्ट होतील. यासाठी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत लिहित जाण्याचे मनोगत आहे. माझ्या ब्लोगवर आपली भेट होतच राहील...


Purchase Anubhuti at: www.smashwords.com/books/view/543035
Facebook page: www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869

1 comment:

  1. खुपच सुंदर रचना आणि मनाला भावेल अशी सुरुवात. आज पहिल्यांदाच तुमच्या मनस्वीला भेटलो, पहिल्याच भेटीत प्रेमातच पडलो म्हणा ना !;-) :-p आता रोजच भेटणं होईल आणि त्या निमित्ताने वार्तालाप ही होईल, तर कधी मतभेद सुद्धा पण ते फक्त विचारांचे होतील यात शंका नाही. झालेली ही पहिली भेट मैत्रीचे धागॆ एकमेकांत गुंफुन खुप दूरवर झाईल याची खात्री आहे.
    चल मनस्वी भेटूया मग नंतर !:-p

    ReplyDelete