Thursday 28 May 2015

अनुभूति: पर्यावरण special



पर्यावरण आणि मानसिकतायांचा निगडीत संबंध अअहे. यांत्रिकीकरण आणि सामग्रीची प्रचंड मागणी हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. विज्ञानाने जसे मानवतेचे कल्याण केले तशीच त्याची हाव ही वाढवली आहे. आज प्रदूषण सर्वत्र आहे. प्रदूषण विज्ञानाने नव्हे तर माणसाच्या लोभीपणामुळे आहे, प्रक्रिया पूर्णपणे पार पाडून जर waste disposal नीट केले तर प्रदूषण कसे होईल? ही प्रक्रिया खर्चाची आहे आणि भांडवलशाही मनोवृत्तीत पर्यावरणाची उपेक्षाच होते. लाचखोर राजकारणी, अधिकारी व लोभी कारखानदार याला हातभार लावतात. प्रत्येकाचा स्वार्थ त्यांत दडलेला आहे आणि दिवसेन दिवस पर्यावरणाला तडाखे बसत आहेत.

ऑटोमोबाईलचा धूर, हवा प्रदूषित करते तर रसायनी कचरा पाणी दुषित करतो. जळणासाठी व कागद बनवण्यासाठी झाडे कापून वनाची, वन्य प्राण्यांची खच्ची होते. पृथ्वीचे संतुलन बिघडते. खनिज द्रव्व्ये व कोळश्याच्या अधिक वापराने जमिनीची धूप तर होतेच पण तापमान देखील वाढते. त्याकारणी हिम वितळून समुद्राची पातळी वाढतेय. भूकंपांचे प्रमाण आणि त्सुनामीची तीव्रता वाढली आहे.

प्रदूषित वातावरणात मनेही प्रदूषित होतात. मोहाला आवर न घालणं, बेफान वागणं, कशाचीच रया न ठेवणं ई. 'राजकारणी व्यापार' करणारा politician, पर्यावाराचा खरा दुश्मन आणि त्यावर मनस्विनी टीका करते. त्सुनामी आल्यावर तिच्या मनावर भारी परिणाम झाला आणि ती त्याचा उल्लेख 'तुझी अवकात' कवितेत करते. हिमालयाकडे गंगा वाहू शकते कां? पण उपहासाने मनस्विनी म्हणते की असंतुलित पर्यावरणाचा परिणाम झालेल्या स्थितित हे कदाचित शक्य होऊ शकेल.

जन्मदात्याला ती बालीश प्रश्र्न विचारते - अनंतातील हालचाली, satellite नं दाखवलेली चिखलातील खेडी, अंतराळातील कचरा, जो पृथ्वीला धडकणार होता, तिचा नाश करू इच्छित होता या सर्व गोष्टी तू का करत आहेस? माणसाने विविध प्रकारे तुझ्या राज्यात घुसखोरी केल्यानं तू रागावला आहेस का? शेवटी रागावलेल्या पित्याची बालकाप्रमाणेच क्षमा मागते आणि राग सोडायला सांगते. या कावितांद्वारे ती पर्यावरणाचा नाश न व्हावा म्हणून विविध भूमिकेतून आपले विचार सादर करते आणि जनजागृती करते.


 

No comments:

Post a Comment