Saturday 23 May 2015

अनुभूति: प्रश्र्न तक्रार सिलसिला


नमस्कार! थोडासा तरी विचार करणाऱ्या व्यक्तीस प्रश्र्न हा पडतोच. त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्याला खूप उप-प्रश्र्नांची मदत घ्यावी लागते. कधी प्रश्र्न सुटतात तर कधी सुटत नाहीत, मग तो त्याबद्दल तक्रार करतो. पुन्हा ती तक्रार दूर करण्यासाठी प्रश्र्न उत्तर, प्रश्र्न उत्तर हाच सिलसिला सुरु होतो. मनस्विनीला समाजातील मोही व्यक्तींचा राग आहे. तिला प्रश्र्न पडतो की माणसाला मोह का होतो? त्याचं उत्तर म्हणजे मोह हा माणसाच्या षडरिपुंपैकी एक आहे जो माणसाचा शाप आहे असे महंत सांगतात. रोजच्या व्यवहारात, राजकारणात याच मोहापोटी काय काय अनर्थ घडतात हे आपणा सर्वांनाच माहित आहे तरी ही तो काबूत का ठेवला जात नाही? याबद्दल मनस्विनीची तक्रार आहे.

दाखवायचा 'मुखवटा' नि 'खरं रूप' वेगळच असतं. धर्माच्या नावाखाली होणारा दान धर्म आणि त्या मागचे खरे कारण वेगळच असतं. याचच उल्लेख तिच्या 'धर्मादाय' कवितेत आहे. चर्चा ही पण याचेच सुधारलेले रूप आहे, चर्चा म्हणजेच वाटाघाटी. यांतून फक्त वेळ, पैसा आणि लोकाच्या आशा यांचा कचरा केला जातो आणि तथ्य काहीच निघत नाही तरीही साध्या सुध्या गोष्टींसाठी ही 'चर्चा' होतात.

स्वार्थी लोकांची हुशारी म्हणजे 'रुमाल' हे रूपक. मनस्विनिने हे अगदी सहज रेखाटले आहे. उत्साही तरुणांची होणारी फसगत तर तिच्या जिव्हारी लागते. गरीबीतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आणि व्यवहार न समजणाऱ्या कोवळ्या तरुणांच्या गरजेचा, गरिबीचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन, त्यांच्या हातून आपला फायदा करून घेण्याच्या समाज्याच्या पद्धतीची तिला चीड आहे. हे सर्व समजूनही ती समाज बदलू शकत नाही म्हणून फक्त तक्रार करते, तिला वेदना होतात, ती खिन्न होते. पण तिच्या कवितांत असे प्रश्र्न वारंवार उपस्थित करून ती जनजागृती करून तिचा कामाचा वाटा उचलू इच्छिते.

दु:ख तर माणसाचा पाठ पुरावा करत असतं. जन्मलेलं बाळ जन्मल्याबरोबर रडतं - कारण माहित आहे? त्याला ह्या घाणेरड्या जगात यावसं वाटत नाही, तरीही यावं लागतं म्हणून! दुसरी गोष्ट घ्या - आपल्या देशांत शिक्षणाला एक अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं. परीक्षेच्या तीन तासांत त्यानं वर्षभर केलेल्या अभ्यासाची परीक्षा होते, आणि निकाल जीवनाचा लागतो. किती unfair? 'निकाल' ही कविता याचेच शब्दचित्र आहे.

मनस्विनीला अनेक प्रश्र्न आणि तक्रारी आहेत तरीही बदलत असलेला समाज आणि स्त्रीची आगेकूच तिला दिलासा देते, तिला आशा वाटते. 'निरुत्तरीत' कवितेत याची प्रचिती येते. तिचं स्फूर्ति स्थान कोण याचं उत्तर मनस्विनीला मिळत नाही म्हणून ती त्याच स्त्रीला याचं उत्तर द्यायला सांगते.

प्रश्र्न तक्रारींचा हा सिलसिला जाणण्यासाठी आणि तिच्या प्रश्र्नांना उत्तरे पुरवण्या साठी 'अनुभूति' काव्य संग्रह वाचा आणि facebook वर कॉमेंट्स लिहा. मनस्विनी त्या वाचायला उत्सुक आहे.

Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869


 

No comments:

Post a Comment