Sunday 31 May 2015

अनुभूति: विडंबन आणि बाष्कळ गीतं


कोणतीही चांगली गोष्ट, कालांतराने कालबाह्य होते. त्यामधील दोष लक्षात येतात, त्यावर टीका ही होतेच. हसत हसत टीका करून आपण त्याची खिल्ली उवतो. काहीसा हाच प्रकार मनस्विनीच्या 'अवघे पाऊणशे वयमान' कवितेत दिसतो. आजची स्वतंत्र स्त्री, आपली हुशारी, चलाखी आणि तिला आलेली जागृती, अगदी हिरीरीने प्रदर्शित करण्याची एकही संधी फुकट घालवत नाही. ह्या कवितेतील नगरसेविकेचे वर्णन विडंबनात्मक आहे. नगराची सेवा सोडून इतर show off मध्ये ती मग्न आहे. नगरसेविकेच्या नातवाची reaction पहाण्यासारखी आहे.

शनीचा उपग्रह 'रिया' बराचसा पृथ्वी सारखा असल्याने, शास्त्रज्ञांनी भविष्यात पृथ्वीवरच्या मानवाला रहाण्या योग्य ग्रह सुचविला आहे. मनस्विनिच्या व्यंगात्मक कॉमेंट्स पहा, उलटा फिरणारा हा ग्रह जो ज्योतिष शास्त्रात त्रास्दायाक मानला जातो, त्यावर लोक असतील तर ते आमच्या लांचखोर राजकाराण्यांसाराखेच असणार. पृथ्वीवरील अशा लोकांना रिया ग्रहच योग्य असा वाचकांचा समज होईल पण मनस्विनी उलट सुचवते की लाचखोर लोकांचा रियावर कसा निभाव लागणार?

अत्यंत भावुक होऊन ती, 'आदर्श घोटाळा' करणारे अनेक लांचखोर अधिकारी आणि राजकारणी यांवर संतापते. खरा प्रश्र्न तिला पडला आहे, कर्तव्यबुद्धी नसलेली ही मंडळी, शहीद जवानांना दिखावटी सन्मान तर देतात पण अशा प्रसंगातही काळी कर्तुते करायला कचरत नाहीत. म्हणून त्यांची नसलेली इज्जत काढायाला ती मागेपुढे पहात नाही.

निव्वळ गम्मत म्हणून लिहिलेली 'बाष्कळ गीते' पण मनस्विनीचा खोडकर टीका करण्याचा माध्यम ठरतो. हसत हसत ती वर्मावर बोट ठेवते आणि वाचकाला बऱ्यांच वेळानी त्याचा अर्थबोध होतो. अनुभूति काव्यसंग्रहाचा शेवट करताना जे 'सद्यस्थिती' भजन ती गाते ते भजन नसून सद्यस्थितीचा उपहास आहे. वाचा आणि स्वतः आनंद लुटा!

No comments:

Post a Comment