Monday 25 May 2015

अनुभूति: निरागसता


निरागसतेचे वर्णन हे मनस्विनीचे वैशिष्ठ्य आहे. व्यक्तितील मासुमियता, पवित्रता, सहजता, नैसर्गिकता आणि भोळेपण हे सर्व निरागसतेत मोडते. निरागसता व्यक्तिमत्वाची किंवा प्रसंगाची असू शकते. ती वाचकाला आपल्या लहानपणीच्या स्मृतीत घेऊन जाते. निरागसता आणि अनभिज्ञता go hand in hand. 'बाहुली' वरचं प्रेम असो की आईच्या तोंडून निघालेली 'आशीर्वादाष्टक' असोत त्यांत तोच पवित्र भाव दिसतो. चोर कसा ओळखायचा हा छोट्या मुलाचा 'अदभुत प्रश्र्न' किंवा picture perfect गावाचं वर्णन निरागसतेची विविध रूपं आहेत. स्नोफॉलचा निस्खळीत आनंद लुटणे, 'शापित सौंदर्य' मधील मनापासून केलेले स्वगत मनस्विनीची निरागसता दर्शवते. या कावितेतील वर्णने जरी वास्ताविकातेपासून थोडी दूर असली तरी मनाला संतोष देऊन जातात.

'धुपकन अचानक' पडणं जितकं नैसर्गिक / स्वाभाविक आहे, तितकच कोण, कुठे, कधी, कसा पडेल हे सांगण कठीणच आहे. गधे पंचविशीतील प्रेम यात, 'का?' प्रश्र्नच उद्भवत नाही कारण ते कुठेही, कधीही, कुणावरही, कुठल्याही कारणानं बसतं. प्रेमाची ही निरागस सुरुवात आहे. प्रेम करण्यातूनच सुसंस्कृत समाजात लग्न रुढ झाले. व्यक्ती जरी निरागस असल्या तरी समाज व्यवहारी आहे, त्यामुळे निरागसता डागाळली जाते आणि लग्नासारख्या पवित्र संस्काराचा बाजार मांडलेले दिसतो. याची मीमांसा मनस्विनी 'मी लग्न करतो' या कवितेत सुलभ प्रकारे करते.

भारतीय संस्कृतीचं सर्वोच्च ध्येय 'मुक्ती' आहे. मुक्ती ही कल्पना जरी निरागस असली तरी पूर्वकालीन चार आश्रम संकल्पनेतून, व्यवहारी दुनियेतील वाटचाल अवघड होते. म्हणूनच 'आत्म्याचं स्वागत' सांगताना निर्गुण निराकाराचा ध्यास कधीच सोडायचा नाही असे मनस्विनी सुचवते.

सौंदर्यात निरागसता आहे, पण 'शापित सौंदर्य' ही reality आहे. मनस्विनीने या कवितेत आशावाद दाखवला आहे की, या चुका दुरुस्त होऊ शकतात आणि हा पण एक तिच्या स्वभावाचा निरागसपणाच आहे.

मनस्विनी जेव्हा चौथ्या पिढीतील परदेशवासी १६-१७ वर्षांच्या मुलाने केलेल्या, 'गाव माझ्या पणजोंचा' ह्या निरागस वर्णनात मायभूमीची ओढ दाखवते, तेव्हा वाचक गदगदतो. मुलगा जरी तीन पिढ्या भारतापासून दूर असला तरी भारताची नैसर्गिक ओढ, त्याची नाळ मायभूमीशी जोडलेली आहे हेच दाखवते.

स्वपनाळू मनस्विनी जरी झुंझार असली, जगाच्या वास्तविकतेला सामोरी जात असली तरी तिची निरागसता ती कायम राखून आहे. तिच्या निरागसतेचा आस्वाद 'अनुभूति' काव्य संग्रह वाचून घ्या. facebook वर कॉमेंट्स करून तुमचे मत मांडा.
Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869

 

No comments:

Post a Comment