Wednesday 27 May 2015

अनुभूति: चेतावणी / सावधानता


अध्यात्मिक परंपरेचा भारत हा शांतताप्रिय देश आहे. आक्रमण करणं हा इथल्या लोकांचा स्वभावच नाही. सरळ, साध्या माणसांचा देश निसर्गाने परिपूर्ण आहे. पण साडे-पांचशें वर्षांच्या गुलामगिरीचे दुष्परिणाम आजही या भूमीत दिसतात. निव्वळ 'अनुकरण' हा त्याचाच परिणाम आहे. कोणत्याही गोष्टीचे मूळ काय? ते आपल्याला कितपत उपयोगी आहे, याचा विचार न करता दुसऱ्याची हुबेहूब नक्कल करणं फार भारी पडतं. परकीयांचा प्रभाव येणं स्वाभाविक असलं तरी अंध, बेशिस्त अनुकरण घातक ठरतं. त्यामुळे अर्धवट रिती रिवाज, कल्पना, खाद्य, कपडे वापरणं किती योग्य आहे असा प्रश्र्न मनस्विनी विचारते. पारंपारिक सद्यस्थिती आणि foreign विचारधारा यांच्या मिश्रणाने समाज रचनेत मोठ्ठा स्फोट होऊ शकतो. तो टाळण्याची सावधानता बाळगणे जरुरीचे आहे.

आज मुली खूप शिकत आहेत, ज्ञानाच्या या उघडलेल्या कवाडांनं तिनं जिद्दीनं पुढे जायला हवं पण त्यात अतिरेक नको. हे मत ती 'सावधान पुरन्ध्रींनो' कवितेत स्पष्ट करते. न जुमानण्याच्या परिणामाची आठवण करण्यास कचरत नाही. कशाच, किती आणि कसं अनुकरण करायचं हे ज्यानी त्यानी ठरवायचं आहे त्यासाठी मुलं लहान असल्यापासून त्यांच्यावर भारतीय संस्कार असणं जरुरी आहे. तिथेच पालकांची खरी जबाबदारी वाढते. कच्चे संस्कार कठीण प्रसंगात ढासळतात आणि माणूस डगमगतो. कोणते ही चांगले काम तडीस नेण्यास बराच काळ नि कष्ट खर्चावे लागतात. insant results संस्कृतीत लोक short cut घेतात आणि पस्तावतात. 'संस्कार कश्याला हवेत' या कवितेत हेच ज्ञान संपादन करायला पक्के संस्कार लहानपणीच व्हायला हवेत हे ती आवर्जून सांगते.

आयुष्यात खोटं बोलणं / खोटं वागणं खूप सोपं आहे पण ते अर्ध्या घटके पुरतं यश देतं. खऱ्याचा मार्ग बिकट /खडतर तरी प्रदीर्घ काळ यश देणारा, शाश्वत आणि त्रिकाळाबाधित आहे. त्यासाठी संस्कार जरूरीचे आहेत आणि ते घरातच होतात. शिस्त ही वैयक्तिक आहे. ही सुधारणा व्यक्तीव्यक्तीत झाली पाहिजे कारण शिस्त व्यक्ती, कुटुंब, समाज मग देश या टप्याटप्याने होते म्हणजे मग देशात परिवर्तन येईल. हेच सूत्र पकडून मनस्विनी संपूर्ण संग्रहात वेगवेगळ्या पायऱ्यांवर सावधानता / चेतावणी देते. कान उघाडणीचे तिचे प्रकार कधी तीव्र आलोचना तर कधी शहाण्याला शब्दाचा मार या पद्धतीचे आहेत.

आज जे 'वास्तव' समोर दिसतं त्यावर मनस्विनीचा विचार वेगळा आहे. आपल्यावर जर कोणी अन्याय केला तर प्रतिकार करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार ती अधिक करते. नियतीच्या अन्यायाला शांत बुद्धीने, धीटपणे सामोरं जायला सांगते. त्यावेळी पाळायचे नियम सांगते, आणि परिणाम सांगते. इथे तिची स्थितप्रज्ञ अवस्थेकडे वाटचाल दिसते. असत्यापुढे नांगी टाकू नका ही चेतावणी ती देऊ पहाते.

मनस्विनी याच जगात रहाते त्यामुळे बदलती समाजाची चित्रे पहाते. कमकुवत भारतीय मनांवर परकीयांचा झालेला परिणाम तिला खटकतो. गुलामगिरी सदृश भासणाऱ्या मनोवृत्तीवर 'इंग्रचीचा पगडा' कवितेत हातोडाच मारते. म्हणजेच आजच्या मुला मुलींची वर्तणूक, फाजील आत्मविश्वास, कुणालाच न जुमानण्याची वृत्ती, तुटक नाते संबंध (आजा-आजी, आई-वडील, बहीण-भावंडे) याचे मूळ, विचाररहित अनुकरण आहे. आजची पिढी स्वातंत्र्यात जन्म घेतलेल्या भाग्यवान मुला मुलींची आहे. ती आता तरुण वयात आली आहे त्यामुळे त्यांनी या कवितेतील मुद्यांचा विचार करावा व सावधानता बाळगावी ही चेतावणी मनस्विनी मनापासून देते.

संपूर्ण देशाच्या स्थरावर पाहिलं तर अयोग्य राजकीय धोरणांनी व निव्वळ (परदेशीय) अनुकरणाने पर्यावरणाची हानी झाली आहे. पर्यावरणाच्या विषयी पुढच्या ब्लॉग मध्ये लिहिते. तोवर अनुभूति संग्रह वाचा आणि facebook वर कॉमेंट्स लिहा.

Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869



No comments:

Post a Comment